महाराष्ट्र व परप्रांतातून प्रकल्पावर येणाऱ्या अत्याचारित, गरोदर आणि शोषित मनोरुग्ण माता-भगिनींसाठी स्वतंत्र व अद्ययावत निवास व्यवस्था उभारणे. यांच्यावर समाजाकडून विविध अत्याचार झाल्यामुळे आणि फक्त तिरस्कार मिळाल्यामुळे यांच्या मनात भीती निर्माण होते. यांना निर्भय आणि मनमोकळे जीवन जगता यावे यासाठी स्वतंत्र व अद्ययावत निवास व्यवस्था प्रस्तावित आहे.
“हा फेरा त्या नियतीचा, ही साधी चक्कर नाही मरणाचे उपाय लाखो, जगण्याला उत्तर नाही मी झाकू आता कुठवर? उघड्यावर पडले जगणे कपड्यांच्या झाल्या चिंध्या, जखमांना अस्तर नाही मरणाचे उपाय लाखो, जगण्याला उत्तर नाही…”
** सेवा संकल्प प्रतिष्ठान **